सोमवारी मुंबई येथे भाजपची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी निवडणूक प्रक्रियेत पंकजा मुंडे या दिसत नाहीत. त्या नाराज आहेत का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना केला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशाची जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात.
तेथे आता निवडणूकही आहे. तिथला प्रभार त्या सांभाळतात. आणि आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो. तुम्ही काळजी करु नका? भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्व परिवाराचे घटक आहोत, असे फडणवीस म्हणाले. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे.






