जिथे बाळासाहेब ठाकरेंचे मोठे होर्डिंग्ज दिसायचे तिथं आज हिंदुत्वाचे नामोनिशाण नाही…

0
404

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा-मित्रपक्षांचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. संजयकाका पाटील, विनयराव कोरे, प्रकाशदादा आव्हाडे, हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज देशमुख आदी इतरही अनेक नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
– शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर, ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. दरवेळी यायचो, तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज हिंदूत्त्वाचे नामोनिशान येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते.
– भगव्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात आहे.
ही संधी गेली तर पुन्हा येथे भगव्याचे दर्शन होणार नाही.
– ही लढाई व्यक्तीची नाही, तर विचारांची आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 रद्द करण्याला विरोध केला, आपल्याला त्यांना परास्त करायचे आहे. यांना तर ‘काश्मीर फाईल्स’ची पण अ‍ॅलर्जी आहे.
– कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न होता, एका झटक्यात आम्ही तो सोडवला.
इथल्या पाण्याचा प्रश्न असो की विमानतळाचा, प्रत्येक विषय सोडविला.
प्रश्न सोडविणार्‍या व्यक्तीचे नाव आहे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.
– कोल्हापुरात पूर आला, तेव्हा आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत ही येथील लोकांच्या स्मरणात आहे.
तुमच्यात देण्याची दानतच नाही. तुम्ही फक्त घरं भरण्याचे काम केले.
– गोकूळची निवडणूक होईस्तोवर लॉकडाऊन लागू दिला नाही.
निवडणूक होताच तो लागू केला. त्याकाळात ज्यांचे मृत्यू झाले, त्याचे उत्तर कोण देणार?
सारेच्या सारे 100 कोटींच्या वसुलीत मग्न आहेत.
– आज महाराष्ट्रात सरकार नाही, तर केवळ भ्रष्टाचार आहे.
सामान्य माणूस होरपळत असताना त्याला कोणतीच मदत दिली गेली नाही.
यांना पुळका दारूचा. दारु विकणार्‍याला सवलती दिल्या आणि पिणार्‍याला ती खुली करून दिली.
– पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक भाजपाशासित राज्याने कमी केले.
हे सरकार 52 रुपये प्रतिलिटर आपल्या खिशात टाकतात. पण, भाव कमी करावा वाटत नाही.
– हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठीच्या निधीत सुद्धा भ्रष्टाचार करते. हे सरकार आहे की सर्कस?
आता एकच नारा : प्राण गेला तरी बेहत्तर, भ्रष्टाचार्‍यांना देऊ भगवं उत्तर!