देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट…

0
87

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून त्याबाबतचं एक पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे.