आणखी मोठं राजकारण? धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली फडणवीसांची भेट

0
2074

महाराष्ट्रातील राजकारणात 30 जून हा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करणं हा त्यामधील सर्वात मोठा ट्विस्ट ठरला. पण या धक्कातंत्राची मालिका रात्र उलटल्यानंतरही संपली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेणं याची चर्चा सुरु झाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात.