महाराष्ट्राचे राजकारण बदलणार? राष्ट्रवादीचे नेते म्हणतात..पुढचा मुख्यमंत्री आमचा

0
767

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असं वक्तव्य केलं. मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून मी ती जबाबदारी पार पाडली. कितीही मजबूत सरकारी पक्ष असला तरी त्याला गदागदा हलवायचं काम मी केलं. आज शब्द देतोय.. सामाजिक न्याय व विशेष विभागाचा मंत्री म्हणून.. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील … ते आपलेच असतील…’ असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं.