धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विखे मंत्री राधाकृष्ण पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

0
27

वाल्मिक कारड यांच्या जवळीकतेमुळे आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे, विरोधकांकडून मुंडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन. घेतलं त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत केलं आहे. एस आय टी चा अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बद्दल निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे, यावर देखील विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून कोणीही नाराज नाहीये, जल संपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही या खात्यात काम करण्यास खूप वाव आहे, नदी जोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात काम करण्यास चांगला वाव आहे, असंही यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.