एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी आज ३० जूनला शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं विधान करत खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.






