नवाब मलिक यांच्यावर भाजपाची नजर!पक्षात येण्याची ऑफर देण्याची शक्यता…

0
28

नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार व अजित पवार अशी 2 शकले पडली. त्यामुळे तुरुंगाबाहेर आल्यानंतर आता नवाब मलिक कोणत्या गटात राहणे पसंत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहेत. त्यांनी त्यांना अनेक ठिकाणी संधी दिली. मंत्री केले. त्यांनीही पक्षासाठी प्रचंड मेहनत केली. त्यामुळे ते शरद पवार यांच्या सोबत राहतील असे मला वाटते. पण भाजप नवाब मलिक यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देऊ शकते.
नवाब मलिक यांना भाजपत येण्यासाठीच जामीन मंजूर करण्यात आल्यासंबंधीच्या प्रश्नावर खडसे उत्तरले की, याची मला कल्पना नाही. पण त्यांना भाजप ऑउफर देऊ शकते. भाजपमध्ये एक मशीन आहे. त्यात कोणतीही व्यक्ती टाकली कीस ती स्वच्छ होऊन बाहेर येते, नंतर मंत्री होते