नगरमध्ये एकनाथ शिंदे समर्थनाचा बॅनर…

0
2261

नगर प्रतिनिधी – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरातील नागापूरमध्ये बॅनरबाजी झाली. मात्र लावलेला हा बॅनर रात्रीतून हटविण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरा हा बॅनर लावण्यात आला होता. नेमकी हा बॅनर कोणी लावला व कोणी हटवला, यावरुन आता चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट दिसू लागली आहे. राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. या सर्व प्रकाराचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध त्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. यामुळे राज्यभरातील शिवसैनिक शिंदे गटाविरुद्ध हिंसक आंदोलन करत आहेत. त्यातून फलकबाजी देखील सुरू झाली आहे. तर मातोश्री’ची भूमिका अंतिम एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये बॅनर लावण्यात आला. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. तत्पूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अहमदनगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक लावले होते. तर दुसरीकडे नगरसेवक मदन आढाव यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर शिवसेनेचे संभाजी कदम यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याच्या सूचना देत, ‘मातोश्री’ची जी भूमिका असेल, तीच अहमदनगर शहर शिवसेनेची भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे