पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत राणे यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसचे काय राहिले आहे, ना देशात ना महाराष्ट्रात. काँग्रेस संकुचित पावत आहे. त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. देशात कोणत्याही प्रकारचं काम कार्य त्यांचे कार्यकर्ते व नेते करीत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे राणेंनी म्हटले. त्यानंतर, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंड यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
”शाब्बास एकनाथजी योग्यवेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.”, असे ट्विट राणेंनी केलं आहे.