Electric Car Tata Nexon EV…
Tata Motors ने देशातील इलेक्ट्रिक कार मार्केटवर चांगलीच पकड बनवली आहे.कंपनीने २९ एप्रिल रोजी आपली नवीन इलेक्ट्रिक कार Tata Avinya चे जागतिक स्तरावर अनावरण केले. त्यानंतर आता कंपनी भारतात सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार Nexon EV चे अपडेटेड मॉडेल 2022 टाटा नेक्सॉन ईव्ही लाँच करणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही कार ११ मे रोजी लाँच केली जाईल. ही कार मोठ्या ड्रायव्हिंग रेंजसह लाँच केली जाणार आहे. तसेच यात अनेक अपडेटेट फीचर्स आणि सेफ्टी पाहायला मिळतील. Tata Nexon EV च्या सध्याच्या मॉडेलची रेंज जवळपास 300 किमी इतकी आहे, आता नवीन Tata Nexon EV मध्ये एक मोठा बॅटरी पॅक दिसेल, ज्यामुळे ही कार सिंगल चार्जवर 400 किमीपर्यंत रेंज देऊ शकते.
Tata Nexon EV च्या अपडेटेड मॉडेलचं भारतात सध्या टेस्टिंग सुरू आहे. ११ मे रोजी नवीन Nexon EV ची किंमत जाहीर केली होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 Tata Nexon EV मध्ये 6.6kW AC चार्जर असेल. या चार्जरच्या फास्ट चार्जिंग क्षमतेमुळे, तुम्ही ही कार घरीदेखील कमी वेळेत चार्ज करू शकाल.
Samsung चा महासेल…स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर भरघोस डिस्काउंट