विधवा सुनेला थरथरत्या हाताने लावलं कुंकू! सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video

0
1151

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आपल्या थेट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच, त्या अनेक ठिकाणी भेट देतात आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी त्यांना वसंत नागदे यांचा अतिशय अभिनव पैलू पाहायला मिळाला. ही गोष्ट त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेयर करत वसंत नागदे यांचं कौतुक केलं आहे.