कलेक्टर होण्यासाठी १०० रूपये तर तलाठी पदासाठी १ हजार रुपये फी, आ. रोहित पवारांनी सरकारला विचारला जाब

0
23

सरकारी नोकरीसाठी काही जागा निघाल्या तरी त्यासाठी लाखो अर्ज दाखल होतात. मात्र, या स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हाच मुद्दा विधानसभेत उचलल्याने परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी 900 ते एक हजार रुपये शुल्क का आकारते, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? असा उद्गविन सवालही त्यांनी केला.