एका लग्नात डीजेच्या तालावर एक महिला डान्स करत होती. खरं तर एक पुरुष या महिलेला जबरदस्तीनं डान्स फ्लोअरवर घेऊन आला. अर्थात महिलेला सुद्धा डान्स करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिचे पाय सुद्धा म्युझिकच्या तालावर थिरकू लागले. पण तेवढ्यात आणखी एक तरुण या महिलेसोबत डान्स करण्यासाठी पुढे आला. ही बाब त्या पहिल्या पुरुषाला आवडली नाही. परिणामी दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. हा व्हिडीओ Mr. Kumar या युट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन पुरूष एकाच महिलेसोबत डान्स करण्यासाठी हाणामारी करताना दिसत आहेत. शेवटी वरातीमधील इतर पाहूणे मध्ये पडले अन् त्यांनी या दोघांचं भांडण सोडवलं. व ती महिला दोघांपैकी एकाला दूर घेऊन गेली. त्यामुळे हे भांडण थोडक्यात आटोपलं.






