मोदी सरकारवर गंभीर आरोप करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने दिल्लीत 30 ठिकाणी छापे टाकले आहेत.सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना (त्यावेळी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला नव्हता) प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती.
किरू हायड्रो प्रकल्पाच्या घोटाळ्यातील आरोपावरु ही छापेमारी सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.






