सनी देओलच्या ‘गदर 2′ चे नगर तालुक्यात चित्रीकरण…

1
4438

20 वर्षांपूर्वी देशभर प्रचंड लोकप्रिय ठरलेला, भारतीयांच्या रोमारोमात ऊर्जा निर्माण करणारा हा संवाद आणि सिनेमाचाही पुढचा भाग भारतीयांना लवकरच पहायला मिळेल. अर्थातच
‘गदर-2′ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, विशेष म्हणजे नगर शहराजवळ सध्या या सिनेमाची निर्मिती सुरू आहे. त्यासाठी तारासिंग (खासदार सनी देओल) व सकीना (अमिषा पटेल) सध्या नगरमध्ये तळ ठोकून आहेत.
गदर चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, आता 20 वर्षानंतर गदरचा पुढील भाग असलेल्या गदर-2 चित्रपटाची निर्मिती सध्या करण्यात येत आहे. या चित्रपटातील काही दृष्यांचे चित्रीकरण नगर शहरापासून जवळच असलेल्या बाराबाभळी परिसरातील डोंगराळ भागात करण्यात येणार आहे. नगरमध्ये तब्बल 20 दिवस चित्रीकरण होणार आहे. प्रसिध्द चित्रपट अभिनेते सनी देओल मुख्य भूमिकेत असून त्यांचे नगरला चित्रीकरण होणार आहे.
सन 2001 साली गदर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. हा चित्रपट देशभरातील टॉकीजमध्ये तुफान चालला होता.या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटात सनी देओले, अमिषा पटेल आणि अमरिश पुरी हे मुख्य भूमिकेत होते. आता तब्बल 20 वर्षानंतर गदरच्या पुढील भागाची निर्मिती केली जात आहे. गदर चित्रपटाचे निर्माते अनिल शर्मा हेच गदर 2 चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात सनी देओल,
अमिषा पटेल यांच्यासह सिमरत कौर, उत्कर्ष पटेल हे मुख्य भूमिकेत आहेत. नारायणडोह (ता. नगर) आणि अन्य ठिकाणी चित्रीकरण केले जाणार आहे. गदर- 2 या चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाक युध्दावर आधारीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

1 COMMENT

  1. खूप चुकीचे लिहले जाते वाचायला जमत नाही काय लिहिलेय हेच समजत नाही

Comments are closed.