छोटा पुढारी दराडे म्हणतो… गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करु नये…

0
23

राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला नगर जिल्ह्यातील घनश्याम दराडे याने आज गौतमी पाटीलवर तोफ डागली. दराडे याचा ‘मुसंडी’ हा चित्रपट येणार असल्याने तो विठ्ठल दर्शनासाठी आला होता. सध्या गौतमी पाटीलवार टीका केली कि लगेच प्रसिद्धी मिळते याची जाणीव असल्याने तिच्यावर अनेकजण तोंड सुख घेताना दिसतात. तसाच प्रकार आज या छोट्या पुढाऱ्याने देखील केला. यापूर्वी देखील घनश्याम याने गौतमी हिच्यावर टीका केली होती. आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत असल्याचे घन:श्याम दराडेने म्हणत गौतमीने देखील आपला मुसंडी चित्रपट पाहावा असे आवाहन केले. मात्र लावणीला बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न केल्यास आपण मुसंडी मारू असा इशाराही त्याने दिला.