धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. अशीच एक तरुणी खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. मुलांनाही लाजवेल अशाप्रकारचे वेगवेगळे स्टंट ही तरुणी बाईकवर करत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी बाईकवर एकापेक्षा एक असे खतरनाक स्टंट करत आहे. स्टंट मारताना तिनं एकदाही आपले पाय जमिनीवर टेकवले नाहीत. एखाद्या हॉलिवूड अॅक्शन फिल्ममध्ये हिरो जसे स्टंट मारून दाखवतो तसा स्वॅग या तरुणीनं दाखवला आहे. स्कूटीच्या तुलनेत बाईक खूप वजनदार असते. अशाच वजनदार बाईकवर या तरुणी स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. काही जण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. या तरुणींनीही धोका पत्करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे






