गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६० हजारांच्या पुढे गेला होता, त्यावेळी २४ तासांत ही किंमत कमी होईल, यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. आज सकाळी बाजार उघडताच सोन्याची सुरुवात ३५० रुपयांच्या घसरणीने झाली. व्यवहारादरम्यान सोन्याने एकदा ६० हजार रुपयांची पातळी गाठली होती, मात्र नंतर त्याचा दर खाली खाली येत गेला.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या गुंतवणूकदारांनी किंचित प्रॉफिट बुकिंग केले आहे, त्यामुळे थोडीशी घसरण दिसून येत आहे. इस्रायल-हमास युद्धाचा ज्वर अजूनही कायम आहे. पाश्चात्य नेत्यांकडून सातत्याने येत असलेल्या वक्तव्यांमुळे मध्यपूर्वेत सातत्याने तणाव वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजता सोन्याचा भाव १०८ रुपयांनी घसरून ५९९६५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता. तर आज सोन्याचा भाव ३५० रुपयांच्या घसरणीसह ५९,७२० रुपयांवर उघडला. एक दिवसापूर्वी सायंकाळी सोन्याचा भाव ६० हजार रुपयांच्या पुढे गेला होता. त्यानंतर रात्री उशिरा बाजार बंद भाव ६०,०७३ रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला.







