१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,२२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,८८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,१८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,९३४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,११० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९३४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,११० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९३४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,११० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९३४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,११० रुपये आहे.