गुगल मॅपवर औरंगाबादचे ‘संभाजीनगर’…खा.इम्तियाज जलिल संतापले

1
1250

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावर आधीच वाद सुरू असताना आता गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव उल्लेख केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने नामकरणाला मान्यता दिली नसली तरी गुगल मॅपने नाव बदलल्याने आता याला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत विरोध केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत थेट गुगलला टॅग करत जाब विचारला आहे.

1 COMMENT

Comments are closed.