गुहागर तालुक्यातल्या आरे ग्रामपंचायतीत चक्क आई विरुद्ध मुलगी मैदानात होती. या लढतीत आईनं बाजी मारत मुलीचा पराभव केलाय. सत्तर वर्षीय सुवर्णा भोसले या ठाकरे गटाकडून तर त्यांची मुलगी प्राजक्त देवकर या शिंदे गटाच्या उमेदवार होत्या. माय विरुद्ध लेकीच्या या लढतीकडे गुहागरवासियांचं लक्ष होतं.
गोंदियातल्या बोधरा-देऊळगाव गावात सूनेनं आपल्या सासूला पराभूत केलंय. सरपंचपदासाठी इथं सासू विरुद्ध सून लढत होती. दोन्हीही उमेदवार अपक्ष होत्या. उमेदवार एकाच घरातले असल्यामुळे मतदान कुणाला करावं, यामुळे भावकीतले लोक बुचकळ्यात पडले होते. नातलगांनी प्रचारावेळीच कुणालाच पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र निकालानंतर नातलग सूनेच्याच बाजूनं उभं राहिल्याचं सिद्ध झालंय