चक्क तरूणाने हेअरस्टाईलसाठी केसांना लावली आग, धक्कादायक व्हिडिओ

0
9

लोकं सुंदर दिसण्यासाठी काय करतील, हे सांगता येत नाही. कोण रंगीबेरंगी केस करत, तर अनेकजण विचित्र हेअरस्टाईल करतात. अगदी वेगवेगळ्या प्रकारे केसं कापतात. असाच एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण आपली हेअरस्टाईल करण्यासाठी केसांना आग लावून घेत आहे.

लोक अनेकदा सलूनमध्ये केसांना सेट घेण्यासाठी जातात. त्यांच्या आवडीनुसार केस कापून घेतात. सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे केस सहसा न्हावी कात्रीने कापतात आणि सेट करतात, पण तुम्ही कधी आगीने केस कापताना पाहिलं आहे का? असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ग्राहकाचे केस कापण्यासाठी कात्रीऐवजी आगीचा वापर करताना दिसत आहे. त्याची केस कापण्याची पद्धत अत्यंत भयंकर आहे.