हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले… चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपतींचा आक्षेप… निर्मात्यांना दिला इशारा

0
482

ऐतिसासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे छत्रपती हे काही चित्रपट निर्मात्यांवर आक्रमक झाले. हर हर महादेव आणि वेडात दौडले सात या दोन चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षेप घेतला आहे.

चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना मी सांगू इच्छितो, जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे. आज छत्रपती शिवाजी महारांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चुक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोड तोड करुन आपल्या समोर मांडतात. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी. ‘ अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटातील कलाकांचा एक फोटो दाखवत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘हे माळ्यांचे पोषाख पाहा. हे काय मावळे आहेत का?’ मी दौऱ्यामध्ये होतो त्यामुळे मी अजून हा चित्रपट बघितले नाहीत पण माझी भूमिका स्पष्ट आहे. चांगले चित्रपट केले तर मी स्वतः दिग्दर्शक यांना कौतुकाची थाप देईल. पण इतिहासाची मोड तोड केली तर गाठ माझ्याशी आहे.’