माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं आहे. बांगर यांच्या कावड यात्रेच्या कार्यक्रमाला कालीचरण महाराजही उपस्थित होती. ही कावड यात्रेत संतोष बांगर यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असं वक्तव्य केलं आहे.
कावड यात्रेत भाषण करताना संतोष बांगर म्हणाले की, बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आमची सत्ता आली तर सगळ्यांना भगव्या टोप्या देऊ. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सगळ्या पोलिसांना भगव्या टोप्या देईन.”