तुकाराम मुंडेंचा रेकॉर्ड मोडला ‘या’ महीला IAS अधिकाऱ्यांची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली!

0
42

आपल्या कारभारामुळे अनेकदा बदली झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे सर्वांना परिचित आहे. कडक शिस्तीचे म्हणून तुकाराम मुंडे अनेक राजकारण्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना नकोसे वाटतात त्यामुळे त्यांच्या बदलीचा रेकॉर्ड आहे. तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीत त्यांची बदली हाच अनेकदा चर्चेचा विषय राहिला आहे. 16 वर्षात 20 वेळा बदली झालेले अधिकारी हे एकमेव अधिकारी असावे. बदलीचा रेकॉर्ड करणारे तुकाराम मुंडे यांची बदली होत असतांना निदान महिना भराचा तर कालावधी मध्ये गेलेला आहे. पण नुकत्याच नाशिक महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्त झालेल्या भाग्यश्री बानायत यांच्या नियुक्तीने तुकाराम मुंडे यांचा रेकॉर्ड मोडला आहे. भाग्यश्री बनायत यांची महिनाभरातच तिसऱ्यांदा बदली झाली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या नावावर जसा कमी वर्षात जास्त बदल्या तसाच काहीसा रेकॉर्ड म्हणजे कमी काळात जास्त बदल्या असा रेकॉर्ड भाग्यश्री बानायत यांच्या नावावर झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये भाग्यश्री बानायत यांची ही महिनाभरातील तिसरी बदली आहे.

शुक्रवारी सायंकाळी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली यादीत भाग्यश्री बानायत यांचेही नाव आहे, बानायात यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिक मनपात आयएएस दर्जाचे अतिरिक्त आयुक्त लाभले आहे.