आयसीसी टी २० विश्वचषकात आज बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. दोन्ही देशातील चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. डिझनी प्लस हॉटस्टार सहित स्टार स्पोर्ट्सच्या वाहिन्यांवर प्रक्षेपित केला जाणार आहे. मागील विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला यानंतर २०२२ च्या आशिया चषकातही निर्णायक क्षणी पाकिस्तानने विजय प्राप्त केला. या दोन्ही पराभवांचा बदला घेण्यासाठी आजचा सामना रोहित शर्माच्या टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सामना सुरु होण्याआधीच दोन्ही देशातून सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल केले जात आहे. अशातच आता पाकिस्तानच्या जर्सीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी जर्सीवर चक्क भारताचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू विराट कोहली याचे नाव व जर्सी नंबर असलेला फोटो तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या एका फॅनने ही जर्सी घातली होती. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर ही व्यक्ती कोहलीची फॅन आहे तर त्यांनी भारतीय जर्सी घालूनच यायचं होतं असाही सल्ला अनेकांनी या पोस्टवर दिला आहे.
Virat Kohli's fans from Pakistan at MCG – King Kohli's fan craze just unmatchable. #kingkholi#WCT20 pic.twitter.com/UIuj35vdUy
— Ismail Shaikh_77 (@its_smail_77) October 23, 2022