बीड : बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथील एका शिकाऊ डॉक्टर ला अटक केली आहे. सतिश सोनवणे असे मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील सीता गाडे या महिलेचं चौथ्यांदा गर्भपात करताना अतिरक्तस्त्राव होऊन 5 जून रोजी मृत्यू झाला होता.
या प्रकरणानंतर जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट असल्याचं उघड झालं. अखेर पोलिसांनी सूत्र फिरवत या प्रकरणी एक अंगणवाडी सेविका, मृत महिलेचा पती, सासरा, भाऊ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आता मुख्य सूत्रधार शिकाऊ डॉक्टर सतिश सोनवणे याला अटक केली. सध्या या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून यामागे कोणाचा वरदहस्त याची चौकशी सुरू आहे.






