भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर कोकणातही अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात गेल्या २४ तासांपासून सरासरी ३९.८ मिमी पाऊस झाला आहे. कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहे. याचदरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने रायगडमध्ये २ एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे, रत्नागिरी-चिपळूण, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या भागात ‘एनडीआरएफ’ची टीम तैनात करण्यात आली आहे. तर नांदेड आणि गडचिरोलीमध्ये ‘एसडीआरएफ’ची टीम तैनात करण्यात आली आहे.