झोपड़ी कॅन्टीन येथील इमारतीवर जाणीवपुर्वक कारवाई न करणा-या अधिका-यांना तात्काळ बडतर्फ करा

0
33

झोपड़ी कॅन्टीन येथील इमारतीवर जाणीवपुर्वक कारवाई न करणा-या अधिका-यांना तात्काळ बडतर्फ करा – अभिजित खोसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर : माऊली चौक सावेडी येथील झोपड़ी कॅन्टीन या इमारतीमध्ये मंजूर नकाशामधील जी पार्किंगची जागा आहे त्या पाकीगच्या जागेमध्ये इमारत मालकाने सदरील जागा ही गोडाऊन साठी भाड्याने दिलेली आहे व त्यामुळे या इमारतीला कोठेही पार्कींगची व्यवस्था नसल्यामुळे तेथे येणारे वाहनचालक हे रस्त्यावरच पार्कीग करत आहे त्यामुळे या महामागांवर वाहतूक कोंडी होत आहे, याबाबत मनपाकडे वारंवार निवेदन देवूनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही, या इमारतीच्या दोन्ही बाजूस असलेल्या इमारती या रोडच्या मध्यापासून जास्त अंतरावर असुन सदरील इमारत ही रोडपासून कमी अंतरावर बांधलेली दिसुन येत आहे. तरी सबंधित इमारतीवर जाणीवपुर्वक कारवाई न करणा-या सबंधित अधिका-यांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई करा व इमारतीची मिळालेली मंजुरी ही योग्य आहे की नाही याचे मोजमाप करून तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी आयुक्तांकडे निवेदनातून केली
निवेदनात पुढे म्हटले की, या कमर्शियल इमारतीमधील जागेची पट्टी ही कमर्शियल पद्धतीने होत आहे की नाही याचीही तातडीने खातरजमा करण्यात यावी. जेणेकरून महानगरपालिकेचा महसूल बुडणार नाही. सध्या अहिल्यानगर शहरात अतिक्रमण मोहिम जोरात सुरु आहे. परंतु पक्के अतिक्रमण पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडी मोकळी होऊ शकते. पक्के अतिक्रमणांबाबत तकारी दाखल असून सुद्धा मनपाद्‌वारे कारवाई होताना दिसत नाही. आम्ही वारंवार सावेडी येथील माऊली चौकातील सदरील इमारतीच्या पार्कीगबाबत दिलेल्या तक्रार अर्जावर आपण कोणत्याही पध्दतीची ठोस कारवाई केलीली दिसून येत नाही याचाच अर्थ महापालिका प्रशासनाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील माऊली चौकातील त्या पक्क्या अतिक्रमणांस अभय मिळत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून माऊली चौकातील त्या इमारतीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलनाशिवाय आम्हांस दुसरा पर्याय राहणार नाही. असा इशारा यावेळी दिला