आमचा व्यक्तिला विरोध नसून प्रवृत्तीला आहे. लिंगनिदान बाबत त्यांची वक्तव्ये अशास्त्रीय, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणि महिलांबाबत भेदाभेद करणारी असल्याने संभाजी भिडे आणि इंदुरीकर यांची प्रवृत्ती एकच असल्याचे खडेबोल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी सुनावले आहे
इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर नगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी इंदोरीकर आणि भिडे यांना चांगलेच फैलावर घेतले. इंदोरीकर यांच्यावरील खटला मागे घ्या, असा दबाव आमच्यावर होता. तसेच आमच्यावर हल्ला होईल अशी शक्यताही पोलिसांनी आम्हांला कळवल्याचा, गौप्यस्फोट गवांदे यांनी यावेळी केला.