Innova Highcross नगरमध्ये उपलब्ध…पेट्रोल व बॅटरी दोन्हीवर चालते…

0
60

Innova Highcrossनगर – पेट्रोल व बॅटरीवर चालणार्‍या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नवीन इनोव्हा हायक्रॉस हे वाहन पाहण्यासाठी कारप्रेमी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, विनायक देशमुख, अक्षय कर्डिले, उद्योजक इंद्रजीत नय्यर, रविंद्र बक्षी, हरजितसिंह वधवा, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, समद खान, बाळासाहेब पवार, बाबा खान, फारुक शेख, सुनिल त्र्यंबके, मनपाचे परिमल निकम, अ‍ॅड. ललित गुंदेचा अनिकेत गुंदेचा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, कैलाश नवलानी, अनिल अ‍ॅबट, डॉ. अनिल आठरे, अर्जुन मदान, अ‍ॅड. जयंत भापकर, अशोक बलदोटा, जवाहर मुथा, डॉ. अनिल आठरे, हेमचंद्र इंगळे, शाम रेणाविकर, डॉ. विजयकुमार सोनार, प्रभाकर बोरकर, नितीन गुगळे, दलजितसिंह वधवा, लकी खुबचंदानी, दिनेश छाबरीया, मोहित पंजाबी, सीए अजय गांधी, वासन टोयोटाचे जनक आहुजा, जतीन आहुजा, अनिश आहुजा, सेल्स मॅनेजर दिपक जोशी, प्रविण जोशी, रविंद्र थोरात आदी सेल्स टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

—————————-
नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये अत्याधुनिक पाचव्या पिढीतील अतिरिक्त सेटअप असलेली स्वचार्जिंग बॅटरी लावण्यात आली आहे. वाहनाचे ब्रेक लावल्यानंतर बॅटरीची चार्जिंग होते. नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडमध्ये क्विल्टेड लेदर पॉवर्ड ऑट्टोमन सीट्स आणि मूड लाइटिंगसह पॅनोरामिक सनरूफ नॉच आहे. यामध्ये हवेशीर फ्रंट रो सीट्स आणि मल्टी झोन एसी आहे. याद्वारे पुढील आणि मागील प्रवाशांसाठी दोन भिन्न तापमान सेट करता येईल. शिवाय, 9 स्पीकर जेबीएल सिस्टीम आहे. वाहनाच्या मागील बाजूस उत्सर्जित करणारे एलईडी टेल लॅम्प, मागील छतावरील स्पॉयलर आणि क्रोम बेल्ट लाइन इनोव्हा हायक्रॉसला एक विशिष्ट ओळख देते. नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये टोयोटा सेफ्टी सीन्स (टीएसएस) प्रणाली वापरून नवीन सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आहे. टोयोटामध्ये डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री-कोलिजन सिस्टीम (चेतावणी) आणि यासारख्या सुरक्षेचे पर्याय दिलेले आहेत.
——————————