पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई तथा वसूली केल्याचे पत्र शुक्रवारी व्हायरल झाले. कृष्ण प्रकाश यांचे रिडर म्हणून काम केलेले एपीआय अशोक डोंगरे यांच्या नावाने व सहीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेले हे पत्र बनावट असल्याचा खुलासा लगेच स्वत: डोंगरे यांनी केला. तर,रात्री उशीरा स्वत कृष्णप्रकाश यांनीही दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे पत्र केवळ बदनामीसाठी व्हायरल केल्याचे स्पष्टीकरण दिले.
डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून कृष्ण प्रकाशांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत चुकीची कामे करून घेतल्याबाबतचा तक्रार अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल झाला. त्याचे खंडन कृष्ण प्रकाश यांनी लेखी खुलासा करीत केले. व्हायरल झालेला हा तक्रार अर्ज तथा पत्र पूर्णतः खोटे असून त्याबाबत डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने ते केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे,अ से या खुलाशात कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखील वारंवार केले गेले. मात्र ते असफल ठरले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Home ब्रेकिंग न्यूज IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली… व्हायरल पत्राबाबत झाला मोठा खुलासा!