मनोज जरांगे यांनी मंत्री गिरीष महाजनांना स्पष्टच सांगितले…मी मेलो तरी..

0
78

राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. एक महिन्याचा वेळ द्या,’ असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर उपस्थितांना केले. मात्र, ‘मराठवाड्याला दोन दिवसांत आरक्षण द्या,’ अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दोन तास झालेल्या चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही. या वेळी आमदार नीतेश राणे, सतीश घाटगे, अविनाश मांगदरे यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याशी संवादही साधला आहे. महिनाभरात राज्य सरकार तुमच्या आंदोलनाची दखल घेईल. तुम्ही सरकारला वेळ द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्याशी चर्चा करतील,’ असेही महाजन म्हणाले.

मात्र, मनोज जरांगे यांनी हात जोडून विनंती करीत म्हणाले, ‘मी मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करीत होतो. मात्र, आमच्यावर पोलिसांकडून लाठीहल्ले करण्यात आले. लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांना बेदम मारहाण झाली. इतकेच नाही, तर छर्रे आणि गोळीबार करण्यात आला. आता आंदोलनात माघार नाही. मेलो तरी चालेल; पण मी आरक्षण मिळेपर्यंत माझे उपोषण सोडणार नाही.