जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. अशातच शिंदे-फडणवीस सरकारने जरांगे यांच्या शिष्टमंडळासह शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत बैठका घेतल्या. तसेच अर्जून खोतकर यांच्या मार्फत जरांगे यांच्याकडे बंद लिफाफा पाठवला. त्यावर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच सरसकट मराठा आरक्षणाची दुरुस्ती झालेली नसल्याचं म्हणत उपोषण सुरूच राहणार असं जाहीर केलं.
मनोज जरांगे म्हणाले, “२००४ च्या जीआरचा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. ७ सप्टेंबरच्या शासन आदेशात सुधारणा झाली नाही. फेऱ्या होऊ द्या, मीही इथे झोपलेलोच आहे. सरकारने अर्जून खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला. मात्र, त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरू राहील.”