तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ‘एसीबी’च्या जाळ्यात

0
788

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एम. एफ. तडवी यांस पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर घटना बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
यावल तालुक्यातील मोहराळे येथील तक्रारदार यांचे वडिलांचे मोहराळे शिवारात शेतजमिन असुन त्या शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे सदर वाद-विवादाबाबत येथील तहसिलदार यांचेकडे दावा दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसिलदार यांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे एम. एफ. तडवी यांनी पंचासमक्ष स्वतःसाठी ५०० रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम तडवी यांनी स्वतः पंचासमक्ष तहसिल कार्यालयात स्वीकारली.