शरद पवारांचे ऐकलं नाही, माझे पाच वर्षे वाया गेले… एकनाथ खडसेंची खंत…

0
47

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितले होते. मात्र आपण शरद पवार यांचं त्यावेळी एकलं नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. ही आपली चूक झाली असल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली. भाजपमध्ये असताना 2019 मध्ये पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळं माझी पाच वर्ष वाया गेल्याचे खडसे म्हणाले.
त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याबाबत शरद पवार मला सांगत होते. मात्र इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो असेही खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.