माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकानं कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. यामुळं जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीच्या पथकाने जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजल्याासून मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या 10 गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली.