जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज होण्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते सुनील कोल्हे व रावसाहेब देशमुख यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. “एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या.