ये मनोज जरांगे पाटील है कौन?… दिल्लीतही हवा…मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

0
65

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज सराटी गावात आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्साही सांगितला. “मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे तुमचं आंदोलन सर्वांपर्यंत पोहोचलंय”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “मी परवा दिल्लीत गेलो होतो. तिथेही मला विचारण्यात आलं, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता है.. तर म्हणाले, उसने तो सबको हिला के रख दिया है”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगिताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.