Monday, May 20, 2024

लॉकडाऊन नाही तरीही जामखेड मध्ये कडकडीत ‘बंद’…. video

जामखेड (नासीर पठाण) :

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चौकात लावलेल्या बॅनर काढतावेळी झालेल्या विटंबना प्रकरणी मुख्याधिकारी यांना निलंबित तर कर्मचारी शंकर बोराटे यास बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शहरातील खर्डा चौकात सर्व पक्षाय नागरिकांन कडुन निषेध करत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.तसेच पाळण्यात आलेल्या बंदला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे बॅनर विनापरवाना लावले यामुळे नगरपरिषदे कडून ते बॅनर काढताना विटंबना झाली यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कर्मचारी यास निलंबीत करावे याबाबत मुख्याधिकारी यांना भेटले परंतु समाधानकारक चर्चा न झाल्याने संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात जाऊन घटनेचा निषेध करून जामखेड बंदचे निवेदन देखील दिले होते. याच अनुषंगाने आज दि ६ रोजी जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या नंतर शहरातील खर्डा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते व नागरीक व व्यापारी उपस्थित होते. या वेळी संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे सर्व सामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देतात. नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या नागरीकांची अडवणूक करतात. कर्मचारी व नागरीकांशी उद्धटपणाने वागतात. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चौकामध्ये बॅनर लावला होता. मात्र मुख्याधिकारी यांच्या सांगण्यावरून कर्मचारी शंकर बोराटे याने तो बॅनर खाली उतरविला तसेच हा बोर्ड पुन्हा कचर्‍याच्या गाडीत टाकून घेऊन गेले. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोर्ड ची विटंबना झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते व कर्मचारी शंकर बोराटे या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच आज नागरीकांनी पुकारलेल्या बंदला शहरातील सर्व स्तरातून पाठींवा देण्यात आला. नागरीकांनी व व्यापार्‍यांनी देखील या बंदला पाठींबा दिला होता. अखेर दोन तासानंतर सदरचा रास्तारोको मागे घेण्यात आला.

आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड अरुण जाधव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडूराजे भोसले, मनसे ता.अध्यक्ष प्रदिप टापरे, बाप्पुसाहेब गायकवाड, अझरभाई काझी, नगरसेवक अमित चिंतामणी, कॉंग्रेस चे व संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष कुंडल राळेभात, सामाजिक कार्यकर्ते वीकी सदाफुले, प्रा विकी घायतडक, आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा राष्ट्रवादी काँग्रेसचे पवन राळेभात, उमर कुरेशी, पत्रकार संघटनेचे मिठूलाल नवलाखा यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र सदाफुले, उपाध्यक्ष मुकुंद घायतडक, संतोष गव्हाळे, सागर सदाफुले, हवा सरनोबत, शिवाजी ससाणे देवा मोरे, अशोक अव्हाड, सुरेखा सदाफुले, कुसुम साळवे, सुरेखा रतन सदाफुले, पुष्पा साळवे सह मोठ्या प्रमाणावर भिमसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक वीर जामखेड

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles