Monday, May 20, 2024

सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

बीड – सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळलेल्या शिक्षकाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी राहुल ईश्वर वाघमारे या शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. राहुल वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. आज सकाळी त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास हाती घेतली. शिवाजी नगर पोलिस या प्रकरणी तपास करत असून त्यांना शिक्षकाच्या घरात एक सुसाइड नोटदेखील आढळली. त्यानंतर सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून सदर शिक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles