…तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार का? जयंत पाटील स्पष्टच बोलले…

0
41

मुंबई : शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. आणि ते त्यांच्या मतावर अजूनही ठाम आहेत. पण महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्यासाठी आग्रह केलेला आहे. यासह वेगवेगळ्या राज्यातील नेते आणि प्रदेशाध्यक्ष हेच सांगत आहेत. सध्यातरी शरद पवारसाहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कार्यकर्त्यांची भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. सर्वांची मतं आणि भावना पवार साहेबांना सांगितल्या. त्यांची भूमिका काय आहे, हेही सांगितलं. महाराष्ट्रातल्या असंख्या कार्यकर्त्यांना तरुणांना आणि त्यांच्या पिढीत काम करणाऱ्या सर्व ज्येष्ठांच्या भावना या आहेत की आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रहावं, अशी सर्वांची मागणी असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर उद्या बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचं नावंही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव सुचवलं आहे. यावरही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. त्यांनी माझं नाव घेतलेलं असलं तरी दिल्लीची जबाबदारी बघता मी महाराष्ट्रात काम करतो. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाहीत आणि संपर्कही नाहीए. यामुळे दिल्लीत बसणाऱ्या लोकसभेत आणि राज्यसभेत काम करणाऱ्या आणि काही वर्षे संसदेत बसून देश बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवार साहेबांना तो अनुभव आहे. म्हणून पवारसाहेबांनी देशात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम केलं, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.