संतोष बांगर शब्दांचे पक्के, मिशा काढल्या तर त्यांचा सत्कार करणार….

0
32

राज्यातील बाजार समितींच्या निवडणुकीवेळी आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन त्यांच्या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून न आल्यास मिशी ठेवणार नाही, असे चॅलेंज दिले होते. मात्र, त्यांच्या 5 जागा आल्यानंतर आता जयंत पाटील यांनी त्यांना चॅलेंजची आठवण करून दिली. ”संतोष बांगर शब्दाचे पक्के, त्यांनी मिशा काढल्या तर सत्कार करू” असे म्हणत त्यांनी जोरदार टोलाही लगावला.
आमदार जयंत पाटील म्हणाले, संतोष बांगर यांनी मिशी काढली का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले शब्दाचे पक्के असतात. त्यामुळे ते मिशी काढतील. मिशी काढली तर बांगर यांचा आपण सत्कार करु, असा टोला जयंत पाटील यांनी बांगर यांना लगावला