सुपरफास्ट स्पीड…नगर शहरात ‘जिओ’ची ५ जी सेवा सुरू…

0
37

अहमदनगर मध्ये जिओ ची फाईव्हजी सेवा सुरु
सुपर फास्ट सर्व्हिससाठी जिओची फाईव्ह जी सेवा उपयुक्त -अल्ताफ सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिओची फाईव्ह जी सेवा आता अहमदनगर मध्ये सुरू करण्यात आली आहे. जिओने देशातील दहा शहरात ही सेवा लॉन्च केली असून, यामध्ये अहमदनगरचा देखील समावेश असल्याची माहिती जिओचे सदस्य अल्ताफ सय्यद यांनी दिली.
रिलायन्स जिओने आग्रा, कानपूर, मेरठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश), तिरुपती, नेल्लोर (आंध्र प्रदेश), कोझिकोड, त्रिशूर (केरळ), नागपूर, अहमदनगर (महाराष्ट्र) या दहा शहरांमध्ये सेवा सुरु केली आहे. इंटरनेट ही सर्वसामान्यांची गरज झाली असताना, सुपर फास्ट सर्व्हिस नागरिकांना मिळण्यासाठी जिओची फाईव्ह जी सेवा नागरिकांना उपयुक्त ठरणार असल्याचे सय्यद यांनी म्हंटले आहे.