केसीआर राव यांची विदर्भात मुसंडी, भाजपचे माजी आमदार ‘बीअरएस’मध्ये दाखल

0
28

देशात आणखी १०-१५ राज्य बनले तर काय जाणार. आणखी राज्य झाले तर विदर्भही वेगळा होईल आणि विकास होईल. पंतप्रधान मोदी आमचे चांगले मित्र आहे. राज्याच्या विकासाबाबत आमच्या बैठका होतात. येत्या काळात आम्ही महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार. सर्व जागा लढवणार आम्ही आमचा बेस बनवणार आहोत. जगभरात सरकारच्या मदतीशिवाय शक्य नाही. भारतात सर्वाधिक कमी सबसीडी दिली जात असल्याचा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला.

विदर्भात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नागपुरात शक्तीप्रदर्शन केलं. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, राजू तोडसाम, माजी अपक्ष आमदार दिपक आत्राम, बीआरएसच्या गळाला लागलेय. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बीआरएसमध्ये जातोय. आगामी विधानसभा निवडणुका लढणार. असा निर्धार या माजी आमदारांनी केलाय. आगामी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बीअएस ची विदर्भात जुळवाजुळव सुरु आहे. अब की बार किसान सरकार, असं म्हणत शहरात सर्वत्र केसीआर राव यांचे होर्डिंग्ज लागले होते.