कळसुबाई शिखरावरील लोखंडी साखळीविषयी तुम्हाला माहिती आहे का?

0
15

जेव्हा तुम्ही कळसूबाई शिखरावर जाल तेव्हा तुम्हाला तिथे एक लोखंडी साखळी दिसेल. या लोखंडी साखळीविषयी तुम्हाला माहिती आहे का? या लोखंडी साखळीविषयी एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की मनात एक इच्छा धरुन ती साखळी जर आपण एका दमात ओढली तर मनातली इच्छा पूर्ण होते, असा समज आहे. अनेक ट्रेकर्स ही हौस पूर्ण करताना दिसतात.
पूर्वी यायला आणि जायला शिडी नव्हकी तेव्हा याचा वापर केला जायचा. साखळीचा उपयोग करुन येण्यासाठी जाण्यासाठी व्हायचा पण आता लोकं या साखळीचा उपयोग इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात. Sachin Pawar Patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काही महिती असेल तर ज्ञानात भर टाका” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जुन्या काळात शिडी नव्हती तर जाण्यासाठी त्याच साखळीचा उपयोग करुन वर जात होते लोक” तर एका युजरने लिहिलेय, “नवसाची साखळी आहे. त्या भागातील लोकांनी सांगितलय. नवस पूर्ण झाल्यावर एका दमात ती ओढायची असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या साखळीविषयी अनेक अफवा आहे”