कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी मानले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आभार

0
992

कल्याण राष्ट्रीय महामार्ग सीना नदीवरील खड्डे बुजवण्याचे काम लोकशाही दिनात लागला मार्गी

नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात असून सीना नदी पुलावर अनेक महिन्यापासून मोठ- मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे नागरिकांना रहदारी करीत असताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते नागरिकांना सीना नदी वरून जात असताना आपला जीव मुठीत धरून जावे लागत होते. याच बरोबर कल्याण रोड परिसरातील अनेक शालेय विद्यार्थी सायकल वरून प्रवास करत आहेत. खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात झाले आहे काही नागरिक अपघातामुळे जखमी झाले होते.सीना नदी वरील खड्डे बुजवण्याचे काम मार्गी लागावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ७/३/२०२२ रोजी लोकशाही दिनामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार दिनांक ४/४/२०२२ रोजी झालेल्या लोकशाही दिनात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी या अर्जाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला खडेबोल सुनावले व तातडीने सीना नदी वरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आला. त्यानुसार दि.५ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्यावतीने तातडीने लोकशाही दिनातील अर्जाची दखल घेत डांबरीकरनाने खड्डे बुजवण्याचे काम केले. त्यामुळे कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी हे काम पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आभार मानुन आनंद व्यक्त केला अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता गाडळकर यांनी केले.