उमेदवारी अर्ज भरण्याकरता १ रुपयाची १० हजार नाणी, चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची दमछाकvideo

0
33

अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात उमेदवारी अर्ज भरण्याकरता मकरंद अनासपुरे यांनी चिल्लर आणली होती. आता असाच प्रकार कर्नाटकात घडला आहे. कर्नाटकात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याचीही प्रक्रिया होत आहे. यातच, एका यादगीर मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, त्याने हटकेपद्धतीने हा उमेदवारी अर्ज भरला असून त्याने चक्क एक एक रुपयांची चिल्लर जमा केली आहे.

“मी माझं आयुष्य माझ्या समाज आणि गावासाठी समर्पित करतोय. स्वामी विवेकानंदा यांचे विचार असलेले एक फलक घेऊन मी आज अर्ज भरण्यासाठी येथे आलो आहे”, असं अपक्ष उमेदवार यांकप्पा यांनी म्हटलं. यांकप्पा यांनी लोकवर्गणीतून १० हजार रुपये गोळा केले आहेत. एक-एक रुपयांचे नाणे जमा करून त्यांना १० हजारांचा निधी गोळा केला. हेच १० हजार रुपये त्यांनी आज कार्यालयात दिले