करुणा शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या पत्रकार परिषदेत मुलगी शिवानी धनंजय मुंडे मोठा गौप्यस्फोट करणार होती. पण ऐनवेळी मुलगी पत्रकार परिषदेस गैरहजर राहिली.
धनंजय यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले. मी मंत्री महोदय यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र मंत्री महोदय यांनीच माझा बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले. यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्री धनंजय मुंडे याच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली. मी मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे. मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही. मी आजपर्यंत त्यांची इज्जत करत होती, मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझा आईची मुंडेंनी हत्या केली, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला.
मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल. धनंजय मुंडे यांनी मी सध्याची पत्नी आणि बहिण याच्या व्यतिरिक्त ३ मुलींना फसवलं आहे. मी ब्लॅकमेलर नाही पण जी पत्नी सध्या त्यांच्यासोबत आहे ती ब्लॅकमेलर आहे. मी जर ब्लॅकमेल करत असती तर मी कर्जबाजारी नसती. या पूर्वी माझे कर्ज धनंजय मुडे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून भरतात ते आजही भरत आहे, असा दावाही त्यांनी केला.






